पहिला पाऊस ........
(मराठी भाषा )
सेजल डांगे
पहिला पाऊस
हर्ष संगतीचा
मृदगन्ध तोच
आठवे मातीचा.....
झरझर तीच
सरीवर सरी
उत्सुकता असे
चाललेली उरी....
न्याहाळु वाटते
कपास तुझीया
ओल्या कायेमध्ये
भासली दुनिया.....
सृष्टी सौर्दयात
भर पडलेली
नुतन कांतीची
छटा वेढलेली.....
संगीत थेंबांचे
नव्या तालावरी
हसू उगवले
धरेच्या अधरी.....
—00—